Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

ऊसाच्या शेताला आग; आग विझवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा जिवंत जळून मृत्यू

Responsive Ad Here



ऊसाच्या शेताला आग; आग विझवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा जिवंत जळून मृत्यू







विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

 जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील बनहट्टी पी.ए. गावात एक हृदयद्रावक घटना घडली असून ऊसाच्या शेताला लागलेली आग विझवण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा जिवंत जळून मृत्यू झाला. येथील मल्लनगौड बिरादार ऊर्फ मेलिनमणी हे दुर्दैवी मृत व्यक्तीचे नाव आहे. 

मल्लनगौड बिरादार यांच्या शेतात अचानक आग लागली असून संपूर्ण ऊस पिकाला आगीच्या ज्वाळांनी वेढले. हे पाहून मल्लनगौड आग विझवण्यासाठी शेतात गेले असता ते जिवंत जळून मृत्युमुखी पडले. ऊस पीक पूर्णपणे जळून खाक झाले आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. ही घटना देवऱहिप्परगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.