Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

उभ्या असलेल्या लॉरीला दुचाकीची धडक : दुचाकीस्वाराचा मृत्यू

Responsive Ad Here



उभ्या असलेल्या लॉरीला  दुचाकीची धडक : दुचाकीस्वाराचा मृत्यू







विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 


 जिल्ह्यातील देवरहिप्परगी तालुक्यातील मार्कब्बिनहळ्ळी क्रॉसजवळ उभ्या असलेल्या लॉरीला मागून दुचाकी धडकल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना देवरहिप्परगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

 सातिहाळ गावचा रहिवासी हनुमंत शेखप्पा पाळ्याद (वय 27) हा मृत दुचाकीस्वार आहे. तो  रात्री सुमारे 9.30 वाजता देवरहिप्परगीहून आपल्या मूळ गाव सातिहाळकडे दुचाकीवर जात असताना ही घटना घडली.

 रात्रीच्या वेळी ऊस भरलेली लॉरी लक्षात न आल्याने दुचाकीने मागून लॉरीला धडक दिली. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी सिंदगी सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

घटनास्थळी पीएसआय सचिन आलमेलकर यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.

या प्रकरणी देवरहिप्परगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.