आदर्श इंग्लीश मिडीयम स्कुल येथे जागतिक अपंग दिन साजरा
दुधनी/ प्रतिनिधी-
प्रहार दिव्यांग क्रांती संघटना बहुद्देशीय संस्था दुधनी तफेऀ आज ३ डिसेंबर जागतिक अपंग दिनानिमित्त आदर्श इंग्लिश स्कूल मध्ये मुलांना लाडू वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व अपंग शाळेचे सह शिक्षक महादेव मांढरे सर यांच्या हस्ते संघटना पूजन व फोटो पूजन महाराष्ट्र पञकार संघाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष विरभद्र पोतदार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडण्यात आले.
यावेळी अध्यक्षीय भाषणात दिव्यांग माणसाचे महत्व आणि सरकार कडून मिळणारे फायदे सांगण्यात आले तसेच व्यवसायासाठी 200 स्क्वेअर फूट जागा, तीन चाकी मोटार सायकल, व पाच टक्के आरक्षण मागणी करण्याचे आव्हान माध्यमातून करावे अशी मागणी करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष बसवणपा कोतली, उपाध्यक्ष लक्ष्मीपुत्र परमशेटी, सचिव भाग्यवंत कोळी व इतर सर्व सभासद उपस्थित होते शेवटी आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष बसवणपा कोतली यांनी मानले.
