Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

मध्यरात्री गॅस सिलिंडर स्फोटामुळे सात दुकाने जळून खाक

Responsive Ad Here

  

मध्यरात्री गॅस सिलिंडर स्फोटामुळे सात दुकाने जळून खाक









विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

मध्यरात्री अचानक लागलेल्या आगी आणि त्यानंतर झालेल्या गॅस सिलिंडर स्फोटामुळे चालुक्य नगरजवळ सातहून अधिक दुकाने जळून राख झाल्याची घटना विजयपूर शहरात घडली आहे.


अचानक उठलेल्या ठिणगीने किराणा दुकानातील सिलिंडरला आग लागली आणि त्यातून मोठा अग्नितांडव उभा राहिला. या आगीत टी-कॉफी, फूड स्टॉलसह अनेक दुकाने क्षणार्धात जळून गेली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी दाखल होऊन योग्य वेळी कारवाई करून आग विझवण्यास यशस्वी झाले. त्यामुळे आणखी मोठी दुर्घटना टळली. सिलिंडर स्फोटाचे दृश्य मोबाइलमध्ये कैद झाले असून ते अतिशय भीषण होते. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.


घटनास्थळी एपीएमसी पोलिसांनी भेट देऊन तपास केला.


**गरीबांचे हाल…**

चालुक्य नगरातील या अग्नितांडवात अनेक छोटे दुकाने जळून गेली. चहा, वडापाव, पाणीपुरी अशी अनेक रस्त्याकडील दुकाने तिथे होती. या दुकानांवरच आपला उदरनिर्वाह अवलंबून असलेल्या गरीब विक्रेत्यांचे सर्वस्व आगीत भस्मसात झाले. आपल्या डोळ्यांसमोर उपजीविकेचे साधन जळताना पाहून दुकानदार हताश होऊन रडत असल्याचे हृदय पिळवटून टाकणारे दृश्य पाहायला मिळाले.