Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

कनेरी अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींना विजयपूर जिल्ह्यात प्रवेशावर घातलेली बंदी निंदनीय

Responsive Ad Here

 कनेरी अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींना विजयपूर जिल्ह्यात प्रवेशावर घातलेली  बंदी निंदनीय









विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

भारतीय संस्कृती व मूल्यांचा प्रसार करणाऱ्या, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणाऱ्या *कनेरी अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींना विजयपूर जिल्ह्यात प्रवेशावर घातलेली बंदी निंदनीय असल्याचे भाजप एस.सी. मोर्चाचे राज्य सरचिटणीस उमेश कारजोळ यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे 

   याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, सरकारने जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव टाकून स्वामीजींना जिल्ह्यात प्रवेशबंदी केली आहे हे राज्य सरकारच्या कुटील धोरणाचे उदाहरण आहे.

   स्वामीजींनी “मुख्यमंत्र्यांच्या कृपेने नियुक्त झालेली मंडळे” असं सत्य मांडल्यामुळे सरकारला ते खपले नाही आणि म्हणूनच त्यांच्यावर अशा प्रकारचा बंदी आदेश जारी करण्यात आला. पण स्वामीजी यामुळे घाबरणार नाहीत. आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत, असे कारजोळ यांनी म्हटले आहे 

   कनेरी स्वामीजींचे व्यक्तिमत्त्व थोर आहे. अध्यात्मिक वृत्ती, संस्कारांचा प्रसार, सेंद्रिय शेतीद्वारे शेतकऱ्यांचे कल्याण व प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या स्वामीजींचे योगदान मोठे आहे.** ते सत्य बोलतात आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद ठेवतात.

पूर्वी वक्फ मंडळाने निरपराध शेतकऱ्यांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा स्वामीजींनी शेतकऱ्यांचा आवाज बनून त्याचा तीव्र निषेध केला होता. हेसुद्धा काँग्रेस सरकारला खपले नव्हते.

स्वामीजींनी समाजात फूट पाडणाऱ्या शक्तींविरुद्ध आणि आमच्या देवतांचा अपमान करणाऱ्यांविरुद्ध आवाज उठवला आहे. त्यांनी कोणत्याही व्यक्तीविरोधात नाही, तर धार्मिक भावना दुखावणाऱ्या वक्तव्यांविरुद्ध* निषेध नोंदवला आहे. “देव नाही, मंदिरात जाऊ नका” असे वक्तव्य करून हिंदूंच्या श्रद्धेवर आघात* करणाऱ्यांविरुद्ध कोणतीही कारवाई का केली जात नाही, असा सवाल त्यांनी केला.

   लिंगायत–वीरशैव असे भेद पाडून द्वेष पसरवणाऱ्यांविरुद्ध स्वामीजींनी केलेली टीकाही योग्यच आहे.*

काँग्रेस सरकार सत्तेत आल्यापासून हिंदूंवर दडपशाही, मठाधीशांवर अनादराची वागणूक सुरू झाली आहे. हा बंदी आदेश तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा सरकारविरुद्ध मोठ्या आंदोलनाची तयारी करावी लागेल, असा इशाराही उमेश कारजोळ यांनी दिला आहे.