Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

विजयपूरचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून डॉ. आनंद के. यांनी कार्यभार स्विकारला

Responsive Ad Here



विजयपूरचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून डॉ. आनंद के. यांनी कार्यभार स्विकारला





विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

दक्षिण कन्नड जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले 2016 च्या बॅचचे IAS अधिकारी डॉ. आनंद के. यांनी 9 जुलै रोजी विजयपूर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्विकारला.

विजयपूरचे मावळते जिल्हाधिकारी टी. भूबलन यांनी नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत करत त्यांना पुष्पगुच्छ देऊन बुधवारी अधिकृतरित्या पदभार सुपूर्त केला.

जनरल मेडिसिन शाखेत एमबीबीएस व एमडी वैद्यकीय पदवी प्राप्त केलेले डॉ. आनंद के. हे मागील दोन वर्षांपासून दक्षिण कन्नड जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत होते.

त्यापूर्वी त्यांनी केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयात सहाय्यक सचिव, गदग जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कर्मचारी व प्रशासन सुधारणा विभागात उपसचिव म्हणून काम पाहिले आहे. तसेच उत्तर कन्नड जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी अधिकारी आणि इंडी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पदावरही त्यांनी सेवा बजावली आहे.