Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

इंडी विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डि के शिवकुमार यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण कार्यक्रम

Responsive Ad Here



 इंडी विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डि के  शिवकुमार यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण कार्यक्रम






विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

 कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री शिवकुमार हे जुलै 14 रोजी विजयपूर जिल्ह्याचा दौरा करणार असून विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.

त्या दिवशी दुपारी 12:05 वाजता सोलापूर विमानतळावरून रस्तेमार्गे निघून, दुपारी 12:50 वाजता विजयपूर जिल्ह्यातील इंडी येथे पोहोचणार आहेत. तेथे ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर भव्य व्यापारी संकुलाचे उद्घाटन करतील तसेच शक्ती योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 500 कोटींच्या टप्प्यापर्यंत पोहोचल्याबद्दल केकेआरटीसी बसची पूजा करतील.

   दुपारी 1:15 वाजता इंडी पोलीस परेड मैदानात जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित इंडी विधानसभा मतदारसंघातील विविध शासकीय विभागांच्या कामांची पायाभरणी व लोकार्पण तसेच लिंबू विकास मंडळाच्या प्रतीकेचे (लोगोचे) प्रकाशन सोहळ्यात सहभागी होतील.

     सायंकाळी 4:30 वाजता इंडी येथून सोलापूर मार्गे परत बंगळुरूला प्रयाण करतील, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.