हिंदु धर्मातुन ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतर करणे थांबवा अन्यथा मोठी आंदोलने करु- श्री श्री 1008 महामंडलेश्वर डाॅ प्रदिप चैतन्य फाले महाराज
परभणी/ प्रतिनिधी
सध्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत हिंदु धर्मातुन ख्रिश्चन धर्मामध्ये मोठ्या संख्येने धर्मांतर होत आहे. धर्माचा नावाखाली महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत गावोगावी जाऊन ख्रिश्चन धर्माचा बोगस प्रचार करुन हिंदु धर्मातुन ख्रिश्चन धर्मामध्ये स्थलांतर ( धर्मांतर) करत असल्याचे माहिती श्री श्री. 1008 महामंडलेश्वर डाॅ प्रदिप चैतन्य फाले महाराज यांनी दिली आहे.
ख्रिश्चन धर्माचे लोक महाराष्ट्रातील काही खेडेगावात जाऊन गोरगरिबांना पैशाची, नोकरीची व अन्य मदतीची आमिष दाखवून हिंदु समाज बांधवांना ख्रिश्चन समाजात धर्मांतर करुन घेत आहेत, तर हिंदु समाज बांधवांनी व सर्व हिंदु संघटनांनी मिळुन ह्या हिंदु धर्मांतर विरोधात सहभागी व्हावे तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व हिंदु समाज संघटनेने मिळुन असल्या समाजकंटकांना हिंदु विरोध व हिंदु संरक्षण कायदा नुसार गुन्हा दाखल प्रत्येक जिल्ह्यात करावे अन्यथा पुर्ण राज्यभर आंदोलन उभे करु अशी आव्हान श्री श्री 1008 महामंडलेश्वर डाॅ प्रदिप चैतन्य फाले महाराज यांनी केले आहे.
