Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

धार्मिक उत्सवांमध्ये प्रमुख मानल्या जाणाऱ्या पारंपारिक आखाडी उत्सवाचे वावी ग्रामस्तांकडून आयोजन

Responsive Ad Here

  धार्मिक उत्सवांमध्ये प्रमुख मानल्या जाणाऱ्या पारंपारिक आखाडी उत्सवाचे वावी ग्रामस्तांकडून आयोजन


 गाव देवी , नरसिह आणि रक्तादेवी  च्या  लिलावाने गाठला उचांक





राम सुरसे / वावी प्रतिनिधी


ऐतिहासिक ओळख असलेल्या सिन्नर तालुक्यातील वावी गावाने धार्मिक उत्सवांची परंपरा कायम ठेवत लोकसंस्कृती जोपासली आहे.आखाडी उत्सवानिमित्त गाव व परिसरातील सर्व लोक एकत्र येत असतात.सुमारे एक महिना अगोदर या उत्सवाची तयारी सुरू असते. आखाडी उत्सवात पसंतीचे सोंग मिळावे म्हणून उत्सव समितीच्या वतीने लिलाव पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. जास्तीत जास्त बोली बोलणाऱ्यांना सोंगे नाचविण्याचा मान मिळतो.


वावी येथील धार्मिक उत्सवांमध्ये प्रमुख मानल्या जाणाऱ्या पारंपारिक आखाडी उत्सवाचे वावी ग्रामस्तांकडून आयोजन करण्यात आले आहे. वरुण राजाला खुश करण्यासाठी पूर्वापार चालत आलेली परंपरा वावीकरांनी जोपासत दशावतार अर्थात आखाडी  हा  महोत्सव दि ३०जुन ते ०४ जुलै पर्यंत  संपन्न होणार आहे.पर्जन्यमान  सुखकर व्हावे  म्हणून वावी गावच्या वतीने देवी  देवतांना  आमंत्रित करण्याची  परंपरा  यादरम्यान पहावयास मिळते. याच पार्श्वभूमीवर आज दि.१४ रोजी गावची सामुहिक बैठक तथा देवी देवतांचा मुखवटयांचा लिलाव संपन्न झाला यात गाव देवी व नरसिंह च्या लिलावाने  उचांक गाठल्याचे दिसून आले. कैन्हया अँक्वाचे व्यवस्थापक शंकर राजेभोसले व योगेश ताजणे यांनी गाव देवीचा लिलाव १७५५५५/-रुपये बोली बोलून घेतला तर  नरसिंहचा लिलाव अभिजित ताजणे यांनी ३६१००/-रुपयांस घेऊन लिलावाचा उचांक पार केला तर रक्तादेवी लिलाव गणेश काळोखे यांनी २१०००/- बोली बोलून घेतला. बैठकित लिलावाची  चढाओढ पहावयास मिळाली. कैलास जाजू यांनी रावणाची भूमिका स्वीकारली भैया काटे याने हेडूंबा चा लिलाव घेतला बजरंगबली च्या भूमिकेत दत्तात्रय पठाडे ,चंद्र -सूर्य साठी अक्षय खर्डे व दर्शन सोमाणी ,इंद्रजीत - गणेश दत्तात्रय पठाडे ,राम लक्ष्मण - गणेश थोरात , तीळसंक्रांत - राजुनाना काटे ,नारदमुनी - अमोल काटे भैरवनाथ साठी शुभम काटे ,वेताळ - विशाल साळुंखे ,वीरभद्र - मनोज सापते ,महादेव - संदीप गायकवाड ,प्रभावळ - भारत वेलजाळी ,खंडेराव महाराजांसाठी -प्रवीण वाजे ,एकादशी - नवनाथ काटे , भीम - बकासुर च्या भूमिकेत चंदूनाना पठाडे व राजू नाना काटे दिसणार आहे.वराह - संदीप गायकवाड ,मच्छ साठी प्रवीण वाजे , तसेच सलग पाच दिवस शारजा च्या भूमिकेत ज्ञानेश्वर काळोखे , राजू मंडलिक , सुनिल शेळके ,मयूर आनप ,वसंत आनप तर सलग पाच दिवस गणपतीच्या भूमिकेत साई कपिले ,गणेश काटे ,गणेश थोरात , संदीप ताजणे ,भास्कर जाधव आदि व्यक्तीनी यावेळी वेगवेगळ्या देवी देवतांचा लिलाव घेऊन प्रत्यक्ष भूमिका साकारणार असल्याची माहिती दशावतार समितीचे अध्यक्ष अशोक ताजने यांनी दिली तर या कार्यक्रमाची दांडी २६ जून रोजी रोवण्यात येणार असल्याची माहिती समितीचे उपाध्यक्ष बाळासाहेब गोराणे व सचिव गणेश वैराळ व दिपक वेलजाळी यांनी दिली आहे.समितीच्या वतीने या उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. ग्रामस्तांमध्ये आखाडी उत्सव होत असल्याने उत्साहाचे वातावरण आहे.