Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

सीईटी परीक्षा केंद्रावर जानवे काढण्याची घटना, ब्राह्मण समाजाकडून निषेध

Responsive Ad Here

  


सीईटी परीक्षा केंद्रावर जानवे काढण्याची घटना, ब्राह्मण समाजाकडून निषेध 






विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

 बीदर आणि शिमोगा येथे सीईटी (CET) परीक्षा देण्यासाठी जात असलेल्या ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्याच्या यज्ञोपवीताला (जानवे)  काढल्याची घटना निषेधार्ह असल्याचे मत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष रोहन विनय आपटे सह विप्र समाजाचे प्रमुख गोपाळ नाईक, प्रकाश अक्कलकोट, विजय जोशी, राकेश कुलकर्णी, व्यंकटेश जोशी, गुरुराज राव व इतरांनी निषेध  व्यक्त केले आहे.


या प्रकरणाबाबत त्यांनी  प्रसारमाध्यमांना दिलेल्या पत्रकात सांगितले की, हे कृत्य करणाऱ्या अधिकाऱ्याला त्वरित निलंबित करून त्याच्याविरुद्ध चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

ब्राह्मण व्यक्तीला यज्ञोपवीत बदलण्यासाठी विशिष्ट नियम आणि परिस्थिती असतात. त्यामुळे यज्ञोपवीत जबरदस्तीने काढून घेणे हे ब्राह्मण समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारे आहे. सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे जानवे काढणे हे अत्यंत निंदनीय घटना आहे सीईटी कडून अशाप्रकारे कुठलेही मार्गदर्शक सूचना जारी केलेली नाही हे कृत्य म्हणजे ब्राह्मणांच्या संविधानिक हक्कांवर घाला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


 

ब्राह्मण समाज हा शांतताप्रिय असून मात्र, अशा घटना सहन करु शकत नाही पुन्हा अशा घटना होऊ नयेत यासाठी सरकार आणि जिल्हा प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी व संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी असं त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.