Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

भावसार समाजाच्यावतीने महिला दिन कार्यक्रम तसेच उपनयन व गुरु दिक्षा कार्यक्रमाचे आयोजन

Responsive Ad Here

 

 

 भावसार समाजाच्यावतीने महिला दिन कार्यक्रम तसेच उपनयन व गुरु दिक्षा कार्यक्रमाचे आयोजन





 विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

      भावसार क्षत्रिय समाज महिला मंडळाच्या वतीने भावसार समाज भवन येथे दि 5 एप्रिल  2025 शनिवार रोजी  सायंकाळी चार वाजता आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. समाजातील महिला,मुलींना आपल्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी एक चांगले व्यासपीठ असून ज्यांना आपली कला सादर करायचे आहे त्यांनी आपल्या नावाची नोंद अध्यक्षा  सौ पद्मा इजंतकर यांच्या कडे करावीत असे कळविण्यात आले आहे.

याच कार्यक्रमात श्री हिंगुलांबिका देवीस अर्पण केलेल्या साड्या महिलांना लकी ड्रॉ द्वारे  वाटप करण्यात येणार  आहेत.


*दि. १० एप्रिल रोजी उपनयन व गुरु दिक्षा कार्यक्रम*

त्याच प्रमाणे 

भावसार क्षत्रिय समाजाच्या वतीने गुरुवर्य ह.भ.प प्रभाकर बुवा बोधले महाराज आणि यशवंत बोधले महाराज यांच्या उपस्थितीत समाज मधील वय वर्षे 5 च्या पुढील मुलांना *उपनयन व गुरु दिक्षा कार्यक्रम* दिनांक 10/04/25 सकाळी ठीक 9-30 वाजता आनंद नगर येथील भावसार सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आले आहे.

आपल्या समाजातील परंपरे प्रमाणे आपल्याला जे 16 संस्कार सांगितले आहेत त्यामधील हे दोन मुख्य संस्कार आहेत.

जीवनामध्ये सांसारिक जीवन व परमार्थिक जीवन जगण्यासाठी हे संस्कार अत्यंत महत्वाचे आहेत तरी समाजातील सर्व बांधवानी याचा लाभ घ्यावा अशी विनंती अध्यक्ष राजेश देवगिरी यांनी केली आहे 

त्या दिवशी सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत पूजा ठिक 9-30 वाजता उपनयनाचा  (मुंजीचा) कार्यक्रम दुपारी 1-30 वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

उपनयन इच्छुकांनी आपले नावे दि. २ एप्रिल ते दि. ९ एप्रिल पर्यंत आपली नोंदणी सराफ बाजार कार्यालय येथे सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत येऊन नोंद करावीत 

कन्हैया पेठकर 8861189283

उमेश देवगिरी 9480431535  यांच्याशी संपर्क करावं 

तरी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावे अशी विनंती असे अध्यक्ष राजेश देवगिरी आणि पंचमंडळ सदस्यांचा वतीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.