आग लागल्याने सांगवीच्या शेतकऱ्याची डाळिंब बाग भस्मसात
राम सुरसे /वावी प्रतिनिधी
सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील सांगवी येथील शेतकरी राजेंद्र ञ्यबक घुमरे यांची तीन एकर डाळींब बाग आगीच्या भक्षस्थानी येऊन जळून खाक झाली.
सांगवी येथील गट क्र. 224 मध्ये घुमरे यांनी तीन एकर क्षेञावरती भगवा वाणाची सुमारे 1060 डाळींब झाडे.05 वर्षापूर्वी लागवड केलेली होती. सदर बाग घुमरे यानी बहार धरण्यासाठी विश्रांतीवर सोडलेली होती. त्यामुळे डाळिंबाच्या झाडास चांगल्या प्रकारे तान बसलेला होता. पिकास दिलेल्या विश्रांतीमुळे डाळिंब झाडाची पाने पूर्णपणे सुकलेली होती व बागेतील गवत सुद्धा पूर्ण पणे सुकलेले होते. इथून पुढे आठ एक दिवसानंतर घुमरे हे डाळिंब बागेस पाणी
देऊन बहार धरण्याचे नियोजन करणार होते. परंतु शुक्रवार दिनांक 07 रोजी घुमरे हे सहकुटुंब कोपरगाव तालुक्यातील धारणगाव टाकळी येथे आप्तेष्टांच्या लग्न सोहळ्यास गेलेले असतानी पाठीमागे त्यांच्या सांगवी येथील डाळिंब बागेस दुपारी 03 वा.अचानक आग लागली. डाळिंब झाडे विश्रांतीमुळे सुकलेल्या अवस्थेत होती व डाळिंब बागेतील गवत पूर्णपणे वाळलेले असल्यामुळे आगिने क्षणार्धात रुद्र रूप धारण केले व संपूर्ण डाळिंब बाग जळून खाक झाली.परिसरातील संपत आभाळे, प्रशांत घुमरे, अविनाश घुमरे सह ईतर शेतकरी यांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतू उन्हाची तीव्रतेमुळे आगीने संपूर्ण बागेस काही वेळातच वेढा दिला व संपूर्ण बाग झळून खाक झाली.
सदर घटनेची माहीती भ्रमणध्वनी द्वारे राजेंद्र घुमरे यांना कळविली असता ते लग्नसोहळा अर्धवट सोडून घरी परतले व जळालेली डाळींब बाग बघून कोलमडून गेले. लहान मुलाप्रमाणे जपलेली डाळींब बाग नष्ट झाल्यामुळे घुमरे यांचे मोठे आर्थिक नूकसान झाले आहे. डाळींब बाग लागवडी नंतर त्यांचे बागेचा हा दूसरा बहार होता. गत वर्षी याच डाळींब बागेतील फळ त्यांनी 151 रू. किलो प्रमाणे विक्री करूण चांगले उत्पन्न घेतलेले होते. परीसरात उच्च प्रतीचे द्राक्ष व डाळींब उत्पादक म्हणून घुमरे यांचेकडे बघीतले जाते. परंतु त्यांची डाळिंब बाग जळून खाक झाल्याने त्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे.
आग लागल्याचे ठोस कारण समजलेले नाही परंतू
डाळींब बाग जळाल्यामुळे माझे पुढील 10/12 वर्षाचे उत्पनावरती पाणी सोडावे लागणार आहे. पुढील लाखो रूपयाचे माझे नूकसान झाले असल्यामुळे मी पूर्णता हतबल झालेलो आहे.माझे पिकाची सिन्नर महसूल विभाग व कृषी विभाग यांनी पंचणामा करूण मला शासणाकडून मदत मिळावून द्यावी हि अपेक्षा.
शेतकरी राजेंद्र त्रंबक घुमरे, सांगवी ता. सिन्नर