Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

विजयपूर महानगरपालिकेचे सर्व ३५ सदस्य अपात्र

Responsive Ad Here


विजयपूर महानगरपालिकेचे सर्व ३५ सदस्य अपात्र







विजयपूर /प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

विजयपूर महानगरपालिकेच्या सदस्यांनी कालावधीच्या आत आपल्या संपत्ती प्रमाणपत्र सादर न केल्याने बेळगावच्या प्रादेशिक आयुक्त संजय शेट्टेणवर यांनी 35 सदस्यांना अपात्र ठरवत आदेश जारी केले आहेत.  

 २४ मार्च २०२५ रोजी बेळगावच्या प्रादेशिक आयुक्त संजय शेट्टेणवर यांनी विजयपूर महानगरपालिकेच्या सर्व ३५ सदस्यांच्या सदस्यत्वाला अपात्र ठरवून आदेश जारी केले आहे भाजप, काँग्रेस, जेडीएस, एआयएमआयएम आणि अपक्ष सदस्यांनी ९ जानेवारी २४  रोजी प्रथम सामान्य सभेत अधिकार स्वीकारल्या होता. नंतर एका महिन्यात संपत्ती प्रमाणपत्र सादर केले नाही, म्हणजे ८ फेब्रुवारी पर्यंत त्यांनी संपत्ती जाहीर करणे आवश्यक होते म्हणून सरकारकडे आणि नंतर उच्च न्यायालयाकडे   पालिकेचे माजी सदस्य प्रकाश मिर्जी आणि मैनुद्दीन बीळगी यांनी  नोव्हेंबर २०२४ सरकारकडे तक्रार केली होती. नंतर त्यांनी कलबुर्गी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. २१-०२-२०२५ रोजी उच्च न्यायालयाने सरकारला कारवाई करण्याची सूचना केली होती 

 त्यानुसार सदस्यांचा अपात्रचे आदेश देण्यात आले आहे.