बसवनगौडा पाटील यांचे निलंबन मागे घेण्यात यावे - राजेश देवगिरी
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
भाजप नेते बसवनगौडा पाटील यत्नाळ यांनी पक्षविरोधी कोणतीही कृती केली नाही, पक्ष विरोधी वक्तव्य केलेले नाही त्यांच्यावर पक्षातून निलंबित करण्याची कारवाई मुळे हजारो भाजप कार्यकर्त्यांना दुःख झाले आहे. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने निलंबल आदेश मागे घ्यावे अशी मागणी माजी उपमहापौर राजेश देवगिरी यांनी केली आहे
आज आयोजित पत्रपरिषदेत बोलताना ते पुढे म्हणाले की, "बसवनगौड पाटील यत्नाळ अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून कार्यरत होते. ते पक्षाचे निष्ठावंत नेते आहेत. त्यांचे निलंबन हे अत्यंत दुखद आणि अपमानास्पद आहे."
नगरपालिकेतील अपात्र सदस्य प्रेमानंद बिरादार यांनी सांगितले की, "यत्नाळ हे प्रामाणिक आहेत आणि ते नेहमीच आपल्या शब्दांवर ठाम राहणारे त्यांनी कधीही पक्षविरोधी वक्तव्य केलं नाही. त्यांनी फक्त भ्रष्टाचार, कुटुंब राजकारण आणि समझोता राजकारणाबद्दल बोलले होते. हे कसे पक्षविरोधी होऊ शकते, हे आम्हाला समजत नाही. पक्षाच्या वरिष्ठांना चुकीची माहिती दिली गेली आहे. हजारो कार्यकर्ते त्यांच्याबरोबर आहेत. निलंबनामुळे पक्षाला मोठे नुकसान होईल. आम्ही वरिष्ठ नेतृत्वाकडे या आदेशाचा पुनर्विचार करण्याची विनंती करतो."
नगरपालिकेचे अपात्र सदस्य राजू कुरियवर यांनी सांगितले, "विजयपूर महापालिकेत भाजपचे १७ सदस्य निवडून आले आहेत. याचे कारण बसनगौड पाटील यत्नाळ आहेत, हे पक्षाच्या वरिष्ठांना समजले पाहिजे. यत्नाळ हे आमचे नेते आहेत आणि त्यांनी काहीही चुकीचे केले नाही. त्यांनी कुटुंब राजकारण आणि समायोजन राजकारणावरील टीका केली होती. भाजप वरिष्ठ नेतृत्वाने निलंबन आदेश मागे घ्यावा आणि कार्यकर्त्यांना नवीन उर्जा द्यावी. अन्यथा, आमचा लढा सुरूच राहील."
यावेळी महापालिका अपात्र सदस्य एम.एस. करडी, गिरीश पाटील, विठ्ठल होसपेट, जवाहर गोसावी, मल्लिकार्जुन गडगी, श्रीशैल कणमुचनाळ, चंद्रू चौधरी, अशोक बेल्लद, लक्ष्मण जाधव आणि इतर उपस्थित होते.