Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

पाच गावठी पिस्तूल, सहा जीवंत काडतुसासह तिघांना अटक

Responsive Ad Here


पाच गावठी पिस्तूल, सहा जीवंत काडतुसासह तिघांना अटक 






विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

गावठी पिस्तूलाचा विरोधात मोहीम राबवत विजयपूर जिल्हा पोलिसांनी पाच गावठी पिस्तूल आणि सहा जीवंत काडतुसे  जप्त करून तीन आरोपींना अटक केली आहे. 

अटकेतील आरोपींमध्ये हवेली गल्ली येथील नयिम सिराज श्यामन्नवर याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि एक जीवंत काडतुस, दुसऱ्या आरोपी निहाल उर्फ नेहाल तांबोळी याच्याकडून तीन गावठी पिस्तूल आणि चार जीवंत काडतुसे तसेच सिद्धू उर्फ सिद्ध्या गुरूपाद मूडलगी उर्फ मूडंगियाच्या कडून एक गावठी पिस्तूल आणि एक जीवंत काडतुस जप्त करण्यात आले, अशी माहिती जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी दिली. 

पत्रकार परिषद मध्ये बोलताना ते म्हणाले की, पोलिसांच्या विशेष तपास पथकाने विजयपूर येथील केआयएडीबी औद्योगिक क्षेत्राजवळ आरोपी नयिम सिराज श्यामन्नवर याला प्रथम अटक केली आणि त्याच्याकडून त्याने अनधिकृतपणे ठेवलेली एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतुस जप्त केली. पुढील तपासानुसार, त्याने आणखी दोन आरोपींना गावठी पिस्तूल पुरवले असल्याची माहिती दिली आणि त्यानंतर इतर आरोपींनाही अटक करण्यात आली. 

अपर पोलिस अधीक्षक शंकर मारीहाळ, रामनगौड हत्ती, डिव्हायएसपी बसवराज यलिगार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते. या पथकात पोलिस अधिकारी मल्लय्या मठपती, ज्योती खोत, कर्मचारी आसिफ गुडगुंती, संतोष मेळसक्करी, रमेश जाधव, एस.ए. बनपट्टी, आसिफ लश्करी, योगेश माळी, भीमाशंकर मखनापूर, आनंद हिरेकुरब, एस.ए. पूजारी, एस.बी. तेलगांव, एस.एस. बिरादार, श्रीकांत पूजारी यांचा समावेश होता. त्यांनी आरोपींना अटक करण्यात यश मिळवले असल्याचे जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी सांगितले.