अक्कलकोट पोलिसांनी पकडलेल्या पाचशे पोती तांदळावर अद्यापही कारवाई नाही!
अक्कलकोट- 16 मार्च रोजी मैंदर्गी येथे कर्नाटक येथील कलबुर्गीहुन सोलापूर कडे जात असलेले दोन आयशर मध्ये पाचशे पोती तांदुळ असल्याचे गोपनीय माहिती पोलिस सुत्रांना कळाली व त्या दोन्ही गाडी पोलिसांनी सापळा रचून पकडले. त्यानंतर पकडलेले तांदुळ तपासणीसाठी धान्य तहसीलदार यांच्या कडे पाठवण्यात आले.
दहा दिवस उलटून गेले धान्य तपासणी झाली का? झाले असेल तर अद्यापही कारवाई का नाही केली अशी चर्चा पोलिस सुत्रांना गोपनीय माहिती देणारे सामाजिक कार्यकर्ते यांनी विचारत आहे.