श्री जयभवानी सोसायटीच्या अध्यक्षपदी सुधाकर घाटगे, उपाध्यक्षपदी विजयकुमार घाटगे बिनविरोध निवड
विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
येथील श्री जयभवानी को.ऑप. क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षपदी सुधाकर घाटगे तर उपाध्यक्षपदी विजयकुमार घाटगे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी कविता जैनापूर यांनी जाहीर केले.
सोसायटीच्या कार्यालयात या निवडणुक प्रक्रियेत संचालक मंडळाचे नूतन सदस्य महादेव शिळके, सतिश घाटगे, बाळ घोरपडे, संजय घाटगे, प्रकाश भोसले, सागर घाटगे, उज्वला पवार, सुवर्णा घाटगे, रमेश चव्हाण, आनंद बंडी उपस्थित होते.