Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

महाशिवरात्री निमित्त पालकमंत्री एम बी पाटील यांच्या हस्ते विशेष पूजा

Responsive Ad Here


महाशिवरात्री निमित्त पालकमंत्री एम बी पाटील यांच्या  हस्ते विशेष पूजा 






विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

 महाशिवरात्रीनिमित्त उद्योग, पायाभूत सुविधा विकास आणि जिल्हा पालकमंत्री डॉ एम. बी. पाटील यांनी आज बुधवार रोजी 770 अमर गणाधीश्वर लिंगाच्या मंदीरात व शिवगिरी मंदिरासभेट देऊन पूजा केली

 सर्वप्रथम, शहरातील 770 अमर गणाधीश्वर लिंगाच्या मंदीरात  विशेष पूजा करून, राज्यभर चांगला पाऊस पडो, शेतकरी आनंदात राहो, शांतता, समृद्धी नांदावी, तसेच राज्याच्या नागरिकांचे कल्याण होवो अशी प्रार्थना केली यानंतर, मीडियाच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी सांगितले की, 12 व्या शतकात 770 अमर गणंगल (शरण) बसवेश्वरांसोबत समाजातील 

अंधश्रद्धा दूर करून समानतेसाठी संघर्ष करत होते. त्यांच्या दिलेल्या योगदानाची आठवण म्हणून त्यांच्याच नावावर 1954 मध्ये शहरात 770 अमर गणाधीश्वर (अमर गणंगल) स्मारक लिंगांची प्रतिष्ठापना करून 1960 मध्ये मंदीर लोकार्पण करण्यात आले होते. सात दशकांनंतर, मागील वर्षी ₹1.51 कोटींच्या खर्चाने मंदिराचे संपूर्णपणे नूतनीकरण करून  शिवरात्रेच्या दिवशी त्याचे पुन्हा एकदा लोकार्पण करण्यात आले, याचे भाग्य मला मिळाले असे त्यांनी सांगितले.



नंतर, शिवगिरिला भेट देऊन तेथे विशेष पूजा करून राज्याच्या नागरिकांसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी अभिनेता, निर्माता बसंतकुमार पाटील उपस्थित होते.


त्यापूर्वी, शहरातील सदाशिव चिक्करेड्डी यांच्या निवासस्थानी, बाळेहोंनूर श्री रंभापुरी मठाचे श्री श्री 1008 जगद्गुरु डॉ. वीर सोमेश्वर राजदेशिकेंद्र शिवाचार्य भगवत्पादर यांची भेट घेतली आणि गुरुवंदन करून आशीर्वाद घेतला.

या वेळी, आमदार विठ्ठल कटकदोंड, कर्नाटक बाल विकास अकादमीचे अध्यक्ष संगमेश बबलेश्वर, मंत्रांचे सार्वजनिक संपर्क अधिकारी डॉ. महांतेश बिरादार, माजी उपमहापौर दिनेश हळ्ळी, 

 चंद्रकांत शेट्टी व इतर 

 उपस्थित होते.