कल्लाप्पावाडीत शिक्षक दिन साजरा
अक्कलकोट/ प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील कल्लाप्पावाडी गावातील जय भवानी नवराञ महोत्सव च्या वतीने गावातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत शिक्षक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रेवणु पांढरे होते .डाॕ राधाकृष्णा सर्वपल्ली यांचे प्रतिमेचे पूजन भिमाशंकर कोळी यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेच्या पूजन सुनील पांढरे यांच्या अमृत हस्ते करण्यात आले.यावेळी इरप्पा डोणे मा.सरपंच अर्जुन हिरकुर ,बापू डोणे, आपाशा हिरकुर , लक्ष्मण डोणे , लक्ष्मण दिगसंगी, गोपाळ जमादार, दत्ता कोळी यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा या शाळेचे मुख्याध्यापक अशोक गावडे व तसेच शिक्षक प्रकाश खदे, महांतेश भंडारकोठे ,भाग्यश्री आलूरे ,लक्ष्मीबाई औराद, मंगलताई कोकरे ,प्रीती पांढरे, भाग्यश्री हिरकुर, पूजा खंदारे ,सखुबाई बिरुणगी यांचा सत्कार करण्यात आले .
यावेळी राजश्री सलगरे व बापू डोणे यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महांतेश भंडारकोटे यांनी केले तर प्रकाश खदे यांनी आभार मानले.
