Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

मुलीच्या बचावासाठी गेलेल्या मुलीसह तिघांचा शेततळ्यात पडून दुर्दैवी मृत्यू

Responsive Ad Here

 मुलीच्या बचावासाठी गेलेल्या मुलीसह तिघांचा शेततळ्यात पडून दुर्दैवी मृत्यू




विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

 विजयपूर जिल्ह्यातील मुड्डेबिहाळ तालुक्यातील हडलगेरी गावात मंगळवार संध्याकाळी म्हशीला पाणी पाजण्यासाठी गेलेल्या व शेततळ्यात पडलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात तिच्यासह तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.  नीलम्मा हुलागप्पा किलारहिट्टी (१६), लडुमुत्या महानिंगप्पा किलारहिट्टी (२५) आणि हदलगेरी येथील यल्लाप्पा शिवप्पा यळवर (३०) अशी मृतांची नावे आहेत.  

नेहमीप्रमाणे नीलम्मा म्हशींना  पाणी पाजण्यासाठी शेततळ्यात गेली होती.   अचानक तीचा पाय घसरून  शेततळ्यात पडली.  नीलम्माचा चुलत भाऊ लडुमुत्या आणि यल्लप्पा, जे तिथे गुरे चारत होते, दोघांनीही तिला वाचवण्यासाठी शेततळ्यात डुबकी मारली.  मात्र वर येता न आल्याने ते बुडाले आणि काही क्षणातच गुदमरल्याने त्याचा मृत्यू झाला. 



     या प्रकरणाची माहिती मिळताच किलारहट्टी कुटुंबासह संपूर्ण गावातील लोक शेततळ्या जवळ जमा झाले.  मुद्धेबिहाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक जलतरणपटू आणि अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने तिन्ही मृतदेह  बाहेर काढले. 

   सीपीआय मल्लिकार्जुन तुलसीगेरी, पीएएसआय संजय तिप्पर्डी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली   बसवन बागेवाडीचे डीवायएसपी बल्लाप्पा नंदगावी यांनीही घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली आणि स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश दिले.  याप्रकरणी सायंकाळी उशिरा मुद्धेबिहाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.