Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

करामसाच्या निबंध व भाषण स्पर्धेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Responsive Ad Here



करामसाच्या निबंध व भाषण स्पर्धेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप


*मराठी आपली आई, कन्नड आपली मावशी; बहुभाषिक ज्ञान विद्यार्थ्यांच्या प्रगतीची गुरुकिल्ली : दिपक शिंत्रे*









विजयपूर / प्रतिनिधि -दिपक शिंत्रेे 

मराठी ही आपली मातृभाषा असून मराठी भाषा, साहित्य, संस्कृती व परंपरा जपणे ही प्रत्येक मराठी भाषिकाची जबाबदारी आहे. त्याचबरोबर कर्नाटक ही आपली कर्मभूमी असल्याने कन्नड भाषेचाही तितकाच आदर केला पाहिजे. ‘मराठी आपली आई, कन्नड आपली मावशी’ या भावनेतून विद्यार्थ्यांनी बहुभाषिक ज्ञान आत्मसात करावे, असे कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिपक शिंत्रे यांनी सांगितले.

  कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेच्या वतीने मराठी विद्यालयात ‘प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम’ या विषयावर निबंध स्पर्धा आणि ‘मोबाईल सोडा, पुस्तक धरा’ या विषयावर भाषण स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धांमध्ये सहभागी तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शिंत्रे बोलत होते.


अंजुमन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जे. जहागीरदार यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा मर्यादित वापर करून पुस्तक वाचनाची सवय लावून घ्यावी, असे आवाहन केले. बहुभाषिक ज्ञानामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावून उच्च शिक्षण व करिअरसाठी त्याचा फायदा होतो, असेही त्यांनी सांगितले.

  प्रमुख पाहुणे कवी मारुती तरसे यांनी प्लास्टिकमुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हासाबाबत विद्यार्थ्यांनी जागरूक राहून जनजागृती करावी, असे आवाहन केले. मोबाईल व डिजिटल साधनांचा योग्य वापर करत पुस्तक वाचनाला प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

  मुख्याध्यापक ऐ. व्ही. दंडगे यांनी स्वागत केले. यावेळी करामसापच्या सहकार्यवाह सौ. लताताई झिंगाडे, खजिनदार कन्हैया पेठकर, श्रीपाद पाटणकर, सौ. अंजली गिरगावकर उपस्थित होते. शिक्षिका सौ. रुपा हिबारे यांनी सूत्रसंचालन केले.