Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

दोन विद्यार्थ्यांचा अपघात; एकाचा जागीच मृत्यू

Responsive Ad Here

 एसएसएलसी पूर्वतयारी परीक्षा देऊन दुचाकीवरून आपल्या गावाकडे निघालेल्या दोन विद्यार्थ्यांचा  अपघात; एकाचा जागीच मृत्यू






विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

जिल्ह्यातील  मुद्देबिहाळ तालुक्यातील बिदरकुंदी गावाजवळ  रस्ते अपघातात एसएसएलसी पूर्वतयारी परीक्षा संपवून दुचाकीवरून आपल्या गावाकडे जात असलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या दुचाकीची आणि मालवाहू वाहनाची समोरासमोर धडक झाली.

या अपघातात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

मृत विद्यार्थ्याची ओळख मुद्देबिहाळ येथील शांतला हायस्कूलचा विद्यार्थी आणि तालुक्यातील गोनाळ पी.एन. गावचा रहिवासी महेश बसप्पा मादर (वय १६) अशी झाली आहे. अपघातात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

  दुसरा विद्यार्थी बिदरकुंदी गावचा श्रीशैल सिद्धण्णा बूदिहाळ हा गंभीर जखमी झाला असून प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी बागलकोट जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

  दरम्यान, मालवाहू वाहन जेवर्गी तालुक्यातील मदरी गावच्या यात्रेत बैल खरेदी करून परत येत असताना हा अपघात घडल्याचे समजते.

घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला असून प्रकरण नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. विद्यार्थ्याच्या अकाली निधनामुळे कुटुंबीय आणि ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे.