Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

श्री छ. शिवाजी महाराज यांच्या जयंती मिरवणुकीदरम्यान दगडफेक करणाऱ्या विरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी

Responsive Ad Here

 

 श्री छ. शिवाजी महाराज यांच्या जयंती मिरवणुकीदरम्यान दगडफेक करणाऱ्या विरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी






 विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

शहरातील समस्त मराठा समाजाच्या वतीने बागलकोट शहरात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती मिरवणुकीदरम्यान पोलिसांवर व मिरवणूकेवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेचा निषेध करण्यात आला. तसेच शांतता भंग करणाऱ्या आणि दगडफेक करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी  मा. जिल्हाधिकारी मार्फत  निवेदन देऊन करण्यात आली.


उत्तर प्रदेशमध्ये ज्या प्रकारे कायद्याची अंमलबजावणी केली जाते, त्याच धर्तीवर कर्नाटक राज्यातही संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना योग्य धडा शिकवावा, अशी मागणी समस्त  मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

मराठा समाजाचे अध्यक्ष  विजयकुमार एस. चव्हाण, महानगरपालिका सदस्य राहुल जाधव, राजू मोरे, तानाजी जाधव, शंकर कनसे, भीमाशंकर शेवाळकर, विजयकुमार घाटगे, संजय जाधव, विजय पवार, अप्पू मक्के, संगमेश जाधव, अशोक हसमगे, सतीश डोबळे, रामू चव्हाण, संपत कुलकर्णी, मोहन शिंदे, सदाशिव कदम, अर्जुन जाधव, विकास चव्हाण, विनोद गवळी, रोहित चव्हाण, दत्ता गोलांडे, सुरेश चव्हाण, पप्पू सूर्यवंशी आदी उपस्थित होते.