द सनराईज क्लासेस कडुन मातृ-पितृ वंदन कार्यक्रम संपन्न
अक्कलकोट/ प्रतिनिधी
दुधनी येथील द सनराईज क्लासेस कडुन मातृ-पितृ वंदन कार्यक्रम महाशिवराञी निम्मित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दुधनी श्री मठाधीश डाॅ. शांतलिंगेश्वर महास्वामी जी यांनी प्रथम दिप प्रज्वलन केले तर वैभव विद्यालय ठाणे निवृत्त मुख्याध्यापक कल्याणराव वागदरी, सोलापूर 24तास न्युज चॅनेल चे संपादक विरभद्र पोतदार यांनी प्रमुख उपस्थितीत फोटो पुजन करण्यात आली.
या कार्यक्रमात डाॅ. शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांनी मातृ-पितृ व गुरु वंदना चे महत्व विद्यार्थी व माता पिता नां सांगितले वागदरी व पोतदार यांनी त्यांच्या विचार मांडल्या.
या कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन मल्लीनाथ विठ्ठल कोळी, मुख्याधिपिका सना नागणसुर सहशिक्षिका सुनंदा इंगळे, ऐश्वर्या परमशेट्टी, पुजा भांजी उपस्थित होते तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून दुधनी शहरातील शांतलिंगेश्वर मठाचे शिवानुभव मंडळाचे महिला व नगरसेविका अंजनाताई पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचालन व आभार कल्याणी कराडे यांनी केले आहे.
