Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

महिलांमध्ये धाराशिव नाशिक, ठाणे–पुणे तर पुरुषांत धाराशिव–पुणे, मुंबई उपनगर–सांगली आमनेसामने

Responsive Ad Here

 ६१ वी पुरुष–महिला राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

महिलांमध्ये धाराशिव नाशिक, ठाणे–पुणे तर पुरुषांत धाराशिव–पुणे, मुंबई उपनगर–सांगली आमनेसामने 

उपांत्य लढती ठरल्या, बीडमध्ये थरार शिगेला







बीड (क्री. प्र.) : बाळ तोरसकर 

बीड येथील श्रीमती योगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात सुरू असलेल्या ६१ व्या पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट झाले आहे. महिला गटात धाराशिव विरुद्ध नाशिक आणि ठाणे विरुद्ध पुणे, तर पुरुष गटात धाराशिव विरुद्ध पुणे आणि मुंबई उपनगर विरुद्ध सांगली हे उपांत्य सामने रंगणार असून अंतिम फेरीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


महिलांच्या सामन्यांनी उडवून दिली धमाल   

धाराशिवची उपांत्यपूर्व फेरीत दणदणीत मुसंडी

महिला गटातील उपांत्यपूर्व सामन्यात धाराशिवने मुंबई उपनगरचा १ डाव २३ गुणांनी (३३–१०) पराभव करत आपली ताकद सिद्ध केली. धाराशिवकडून संध्या सुरवसे (४.१० मि. संरक्षण व २ गुण), मैथिली पवार (३.०० मि. संरक्षण), सुहानी धोत्रे (८ गुण), प्रणाली काळे (६ गुण), अश्विनी शिंदे (नाबाद १.५० व २.२० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी विजयात निर्णायक भूमिका बजावली. मुंबई उपनगरकडून देविका अहिरे (१.१० मि. संरक्षण) आणि साक्षी वाफेलकर (१.२० व १.४० मि. संरक्षण व २ गुण) यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.


ठाण्याची सांगलीवर मात

महिलांच्या दुसऱ्या सामन्यात ठाण्याने सांगलीचा ८ गुण व ५.०० मिनिटे राखून पराभव केला. ठाण्याकडून धनश्री कंक (२.४५ मि. संरक्षण), साक्षी तोरणे (२.१९ मि. संरक्षण), गीतांजली नरसाळे (२.२० मि. संरक्षण), प्रियंका भोपी (१.४५ मि. संरक्षण), दीक्षा काटेकर (२ मि. संरक्षण) यांनी भक्कम कामगिरी केली. सांगलीकडून स्वप्नाली तामखडे (१.२० मि. संरक्षण), दीक्षा पाटील (१.१५ मि. संरक्षण), प्रतीक्षा बिराजदार (२, १.२० मि. संरक्षण व ८ गुण) यांनी सामन्यात चुरस निर्माण केली.


पुण्याने अहिल्यानगरला दिली धोबी पछाड. 

महिलांच्या तिसऱ्या सामन्यात पुणे संघाने अहिल्यानगरचा १ डाव ४१ गुणांनी (५१–१०) पराभव केला. पुण्याकडून दिपाली राठोड (४.०० मि. संरक्षण व १० गुण), भाग्यश्री बडे (२.५० मि. संरक्षण व २ गुण), श्वेता वाघ (३.०० मि. संरक्षण व ४ गुण), साक्षी वसावे (२.४० मि. संरक्षण), श्वेता नवले (२.५० मि. संरक्षण व २ गुण) यांनी चमकदार खेळ केला. अहिल्यानगरकडून भाग्यश्री उबळे व समीक्षा माळी यांनी लढत दिली.


नाशिकचा रत्नागिरीला धक्का

महिलांच्या चौथ्या सामन्यात नाशिकने रत्नागिरीचा ८ गुणांनी (२८–२०) पराभव केला. नाशिककडून सरिता दिवा (२.२० व २.१० मि. संरक्षण व ४ गुण) हिने अष्टपैलू खेळ केला. रत्नागिरीकडून पायल पवार (१.१० व २.५० मि. संरक्षण व ८ गुण), अपेक्षा सुतार (१.५० मि. संरक्षण), दिव्या पाल्ये (४ गुण) यांनी चांगली कामगिरी केली.


पुरुषांमध्ये झाल्या रंगतदार लढती

मुंबई उपनगरची दमदार सलामी

पुरुष गटातील पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात मुंबई उपनगरने साताऱ्याचा १० गुण व ७ मिनिटे राखून (३०–२०) पराभव केला. मुंबई उपनगरकडून हर्षद हातणकर (२ मि. संरक्षण व ६ गुण), ऋषिकेश मुरचवडे (१ मि. संरक्षण व ६ गुण), रामचंद्र झोरे (१.२० व १.३० मि. संरक्षण व ४ गुण), धीरज भावे (१.५० मि. संरक्षण) यांनी भक्कम खेळ केला. साताऱ्याकडून दिग्विजय मासाळ (१.२० मि. संरक्षण व ६ गुण), लोकेश जाधव (नाबाद १.४० मि. संरक्षण), ओम बोडरे (१.२० मि. संरक्षण व २ गुण) यांनी प्रयत्न केले.


पुण्याचा ठाण्याला दणका 

पुरुषांच्या दुसऱ्या सामन्यात पुण्याने ठाण्याचा ३३-२८ असा ५ गुण व ६.४० मिनिटे राखून पराभव केला. पुण्याकडून प्रतीक वाईकर (२ व १.४० मि. संरक्षण), रविकिरण काजवे (८ गुण), शुभम थोरात (१.२० मि. संरक्षण व १२ गुण), मिलिंद कुरपे (१.२० व १.३० मि. संरक्षण), शिवराम शिंगाडे (१.३० व १.२० मि. संरक्षण) यांनी निर्णायक खेळी केली. ठाण्याकडून शुभम उतेकर (१.४० मि. संरक्षण व १० गुण), शुभम जाधव (१ व १.३० मि. संरक्षण व २ गुण), आदित्य पाटील (१.३० व १ मि. संरक्षण व २ गुण) यांनी चांगली लढत दिली.


धाराशिवने उडवला मुंबईला विरुध्द बार

पुरुषांच्या तिसऱ्या सामन्यात धाराशिवने मुंबईचा ३१-२६ असा ५ गुण व १.३० मिनिटे राखून चुरशीच्या खेळात पराभव केला. धाराशिवकडून जितेंद्र वसावे (१.३० मि. व नाबाद २.२० मि. संरक्षण व ४ गुण), श्याम ढोबळे (७ गुण), भारतसिंग वसावे (१.३० मि. संरक्षण), राज जाधव (१.३० व १.२० मि. संरक्षण व २ गुण), अनिकेत पवार (२.२० मि. संरक्षण), हरद्या वसावा (४ गुण) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. मुंबईकडून वेदांत देसाई (२.१० व १.२० मि. संरक्षण व २ गुण), पियुष घोलम (१.०० मि. संरक्षण व ८ गुण), सम्यक जाधव (१.१० व २.१० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी चांगली कामगिरी केली.


सोलापूर–सांगलीतील लढत रंगतदार

चौथा सामना सांगली विरुद्ध सोलापूर अत्यंत चुरशीचा ठरला. निर्धारित वेळेत ३६–३६ बरोबरी सुटल्यानंतर सोलापूरने जादा डावात २ गुण व ५० सेकंद राखून (५४–५२) विजय मिळवला. सोलापूरकडून सौरभ चव्हाण (१.२० मि. संरक्षण व १० गुण), नीरज कोळी (८ गुण), अजय कश्यप (१.१० व १.३० मि. संरक्षण व ६ गुण), जुबेर शेख (१.१५ व १.२० मि. संरक्षण व ४ गुण), सुजित मेटकरी (१.२५ मि. संरक्षण व ८ गुण) यांनी उत्कृष्ट खेळ केला. सांगलीकडून आतिश तलप (१.२० व २.१० मि. संरक्षण व २ गुण), मिलिंद चावरेकर (१.०० व १.०० मि. संरक्षण व १० गुण), अक्षय मासाळ (१.१२ व १.१८ मि. संरक्षण व ६ गुण), प्रेम रणदिवे (१० गुण) यांनी शेवटपर्यंत झुंज दिली.