नरहरी आर्थिक विकास महामंडळाचा लाभ सुवर्णकार युवकांनी घ्यावा -- मोहन मंद्रूपकर
सोलापूर/ प्रतिनिधी
सोलापूर -- विविध लोकप्रतिनिधी, विविध सोनार समाज संघटना, संस्था यांचेकडून सतत केली जाणारी मागणी विचारात घेऊन शासनाने सोनार समाजाच्या सर्वांगीण विकास व आर्थिक उन्नतीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळ अंतर्गत उप कंपनी म्हणून संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून मंडळ कार्यान्वित ही करण्यात आलेले आहे. सोनार समाजातील युवकांनी या आर्थिक महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा --बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना, वयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण योजना, महिला स्वयं सिद्धी व्याज परतावा योजना. आदींचा लाभ घ्यावा.
या योजनेतून सुवर्णकार युवकांनी सोनार काम, सराफी व्यवसाय, शेती व्यवसाय, शिक्षण, उद्योग धंदे तसेच महिला बचत गट, तरुणांनी कौशल्य विकास आदी योजनेचा लाभ घ्यावा जेणेकरून रोजगार निर्मिती होऊन आर्थिक व सामाजिक विकास साधला जाईल. तरी सुवर्णकार युवकांनी याचा लाभ घ्यावा.असे आवाहन सोनार समाज संस्था सोलापूर चे अग्रणी प्रवर्तक मोहन मंद्रूपकर यांनी केले आहे.

