दहीगाव हायस्कूल मधील माजी विद्यार्थ्यांनी मैदानी खेळासाठी केली मदत
नातेपुते /प्रतिनिधी - श्रीकांत बाविस्कर
माझा खेळ ,माझा अभिमान! खो-खो साठी काहीही….दहिगाव हायस्कूल,दहिगाव कायम खो-खो मधे दबदबा असणारी तालुक्यातील एक प्रशाला अनेक खेळाडू जिल्हा,विभाग,राज्य पातळीवर पोचलेले.खो-खो वर प्रेम करणारे माजी विद्यार्थी याच प्रेमापोटी चालू वर्षी शालेय क्रीडा स्पर्धेत तालुकस्तरावर विजयी ठरलेल्या १७ वर्ष वयोगट मुलींना सन १९९९-२००० च्या एस.एस.सी बॅच च्या सौजन्याने शिक्षक -विद्यार्थी यांना खो-खो गणवेश देण्यात आला.या गणवेशाचे अनावरण प्रगत शिक्षण संस्था,दहिगाव च्या संचालिका एडव्होकेट वनितादेवी विठ्ठलराव पाटील व प्रशालेचे मुख्याध्यापक चव्हाण सर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
याप्रसंगी प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.संस्थेच्या अध्यक्षा वंदनादेवी विठ्ठलराव पाटील यांनी संघाला जिल्हा पातळीवरील सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि एस.एस.सी १९९९-२००० च्या बॅच मधील माजी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाबद्दल कौतुक केले.

