Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

तंबाखू उत्पादने विक्री दुकानावर धाड, दंड वसूल

Responsive Ad Here


तंबाखू उत्पादने विक्री दुकानावर धाड, दंड वसूल






विजयपूर/ प्रतिनिधी  - दिपक शिंत्रे  

जिल्ह्यातील मुद्देबिहाळ शहरात तंबाखू नियंत्रण कक्ष व तालुका तंबाखू तपासणी पथकाच्या सदस्यांसह  कोटपा 2003 कायद्यांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश तिवारी यांच्या नेतृत्वाखाली तंबाखू उत्पादने विक्री करण्यारा दुकानावर धाड टाकण्यात आली.

शहरातील बसवेश्वर चौक ते आलमट्टी रस्ता तसेच मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांवर असलेल्या पान शॉप्स व हॉटेल्सना इशारा देऊन तपासणी करत दंड आकारण्यात आला. या धाडीमध्ये नागरिकांना तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम याबाबत माहिती देण्यात आली.


तंबाखू उत्पादने विकणाऱ्यांना दंड वसूल तंबाखू उत्पादने विकणाऱ्या दुकानमालक व व्यापाऱ्यांविरोधात कोटपा 2003 कायद्याअंतर्गत 10 प्रकरणे नोंदवण्यात आली असून, ₹3700 दंड वसूल करण्यात आला. कायद्याच्या कलम 4 व 6(अ) अंतर्गत फलक लावण्यात आले असून, तंबाखू उत्पादने संबंधित जाहिरात फलक हटवण्यात आले.

या कारवाईत अमलदार बी. एस. तडकल गृह रक्षक शरणू हेब्बाळ वरिष्ठ आरोग्य निरीक्षक यल्लप्पा चलवादी आरोग्य निरीक्षक एम. एस. गौडर आर. एस. सज्जन, इस्माईल वालिकार, तसेच नगरपरिषद कर्मचारी व आशा कार्यकर्त्या  सहभागी झाल्या होत्या.