Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

पार्क क्लब येथे टेबल टेनिस स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद!

Responsive Ad Here

 पार्क क्लब येथे टेबल टेनिस स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद!





मुंबई क्रिडा प्रतिनिधी- बाळ तोरसकर 

मुंबई : दि पार्क क्लब आणि कुणाल डेरे स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी पार्क येथे भव्य टेबल टेनिस स्पर्धेचं यशस्वी आयोजन करण्यात आलं. शहरातील तरुण खेळाडूंनी या स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला आणि उत्कृष्ट कौशल्य, शिस्त आणि क्रीडाभाव याचं सुंदर दर्शन घडवलं.


या स्पर्धेतील झगमगते तारे ठरले विराज अजगावकर आणि तनिष्क शिंदे, जे आपल्या जबरदस्त खेळाने प्रेक्षकांची मनं जिंकत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. विशेष उल्लेख करावासा खेळ दाखवला आरीश थवानी याने, ज्याने अंडर-१५ गटात झुंजार लढतीत झीअस करारियाला पराभूत करत विजेतेपद पटकावले.


ही स्पर्धा केवळ खेळाडूंसाठी मंच नव्हती, तर ती होती संयोजन कौशल्याचं जिवंत उदाहरण! सुरेख आयोजनामागे कार्यरत असलेल्या समितीच्या मेहनतीला मानाचा मुजरा!



अध्यक्ष: सौ. वरदा चुरी, क्रीडासचिव: दीपक पंडित, किरण जोशी आणि मोहित पटवर्धन यांनी दिलेल्या विशेष सहकार्याबद्दल हार्दिक आभार.


दि पार्क क्लब तर्फे सर्व विजेते व सहभागी खेळाडूंना हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!