Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

आपल्याच आत्याच्या अंगावरील सोनं लुटले पुतण्यानी,, विजयपूर जिल्ह्यात घडलेली घटना

Responsive Ad Here

 


आपल्याच आत्याच्या अंगावरील सोनं लुटले  पुतण्यानी,,  विजयपूर जिल्ह्यात घडलेली घटना



विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

इंडी तालुक्यातील अंजुटगी गावातील 70 वर्षांच्या निंबव्वा पुजारी आपल्या पुतण्या निंगप्पा पुजारीसोबत बागलकोट जिल्ह्यातील गुलेदगुड्ड येथील नातेवाईकांच्या घरी गेल्या होत्या. संध्याकाळी दोघंही गुलेदगुड्ड येथून निडगुंदमार्गे झळकी येथे बसने परतले आणि तिथून निंबव्वा या पुतण्यासोबत बाईकने अंजुटगीकडे निघाल्या.

रात्री 9 च्या सुमारास रस्त्यात बाईकचं पेट्रोल संपलं, असं सांगून निंगप्पा तिथून गेला. काही वेळाने तो कपडे बदलून, चेहऱ्यावर कापड बांधून आणखी एका व्यक्तीसोबत तिथे आला आणि निंबव्वाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून, तोंड कापड दाबून, त्यांच्या अंगावरील 130 ग्रॅमहून अधिक सोनं लुटून पळून गेला.

यानंतर निंगप्पा कपडे बदलून परत आला आणि झळकी पोलीस ठाण्यात आत्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची तक्रार दाखल केली.

सुरुवातीला पोलीस दुसऱ्यांवर संशय घेत होते, पण निंबव्वा यांनीच पुतण्यावर संशय व्यक्त केला. त्याचबरोबर पोलिसांनी मोबाईल टॉवर लोकेशनच्या आधारे तपास करताच, त्या वेळी त्या रस्त्यावर इतर कोणीही गेले नव्हतं, हे स्पष्ट झालं. तसेच निंबव्वा यांनी दिलेल्या माहितीनुसार निंगप्पाच दरोड्यामागे असल्याचं समोर आलं.

पोलिसांनी निंगप्पाला अटक करून चौकशी केली असता, त्याने ही बनावट दरोड्याची योजना आखल्याचं कबूल केलं. त्या दिवशी निंगप्पाने निंबव्वा यांना बाईकवर घेऊन गेला आणि पेट्रोल संपल्याचं सांगून थांबवून गेला. मग त्याने आपल्या मित्र परशुराम बंदपट्टी याला फोन करून बोलावलं आणि दोघांनी मिळून दरोडा घातला.

सध्या झळकी पोलिसांनी निंगप्पा पुजारी आणि त्याच्या साथीदार परशुराम बंदपट्टी यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली होती. आता दोघेही जामिनावर बाहेर आले आहेत.