सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवकाच्या मुलाने डोक्यात गोळ्या झाडून घेऊन केली आत्महत्या
विजयपुर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक प्रकाश मिर्जी यांचा मुलाने आपल्या घरात स्वताच्या डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शहरातील शिकारखाना परिसरात घडली आहे
अशनम प्रकाश मिरजी (वय२२) यांनी गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली आहे.
तरुणाचे वडील आणि माजी नगरसेवक प्रकाश मिरजी यांच्या नावावर असलेल्या परवानाधारक
पिस्तूल घेतली आणि बेडरूममध्ये जाऊन स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली.
आईवडील आणि इतर घरी असताना सकाळी ११च्या सुमारास ही घटना घडली आहे.
गोळीबाराचा आवाज ऐकून त्याच्या पालकांनी धावत जाऊन दरवाजा उघडून पाहिलं असता मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळून आला तातडीने त्यास बीएलडीई रुग्णालयात नेण्यात आले मात्र
डॉक्टरांनी तरुण आधीच मरण पावला असल्याचे घोषित केले.
डीवायएसपी बसवराज यलिगर, सीपीआय मल्लैया मठपती आणि एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अशनम मिर्जी हा काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होता असे समजून येते मृतदेहाचे शवविच्छेदन करून कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहे
एपीएमसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना असून तरुणाच्या आत्महत्येचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
