विजयपूर प्रतिनिधी- दीपक शिंत्रे
बागलकोट येथील श्री बोधले महाराज मठात 15 दिवसीय आध्यात्मिक संस्कार शिबिराचे आयोजन
बागलकोट -
गुरुवर्य प्रभाकरदादा बोधले महाराज यांच्या आशीर्वादाने ,श्री गुरु जयवंत महाराज बोधले यांच्या मार्गदर्शनाने व भावसार क्षत्रिय समाज अंबा भवानी ट्रस्ट बागलकोट यांच्यासहकार्याने 15 दिवसीय आध्यात्मिक संस्कार शिबिराचे श्री गुरु यशवंत महाराज बोधले यांनी आयोजन केले आहे.
श्री सद्गुरू माणकोजी बोधले महाराज मठ नवनगर बागलकोट येथे आयोजित या शिबिरात
दि.१५ पासून २९ मे पर्यंत रोज
सकाळी 5.30 ते 6.30 योगा
6.30 ते 8.00 प्रातर्विधीस्नान वैगेरे
ठिक 8.00ते 9.00आरती पूजा प्रार्थना इत्यादी
9.00 ते 9.30 नाष्टा
9.30 ते 12 विष्णू सहस्रनाम , भगवत गीता अभ्यास, दुपारी 12 ते 3 भोजन व विश्रांती
दुपारी 3 ते4 मृदंग वादन,4 ते 5 हरिपाठ 5 ते 7अल्पोपहार व विश्रांती 7 ते 9 अभ्यास या प्रकारे राहील दहा वर्षा पुढील मुलं शिबिरात सहभागी होऊ शकतात शिबिर शुल्क रु 1100/- रुपये असून शिबिरात सहभागी होणाऱ्यानी आपली नावे दि 1 मे पर्यंत नोंदवावी.
या शिबिरात ह. भ. प. विष्णू महाराज आळंडी, ह. भ.प. ज्ञानेश्वर बोंबलेकर गुळेदगुडृ , ह.भ.प. भानुदास सरवदे बंकापूर, मृदंग शिक्षक ह.भ.प. प्रथमेश, व सुब्बण्णा सरवदे बंकापूर, योग शिक्षिका सौ मिराताई मनोहर कांबळे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
व्यवस्थापक समिती पुढीलप्रमाणे,, ह.भ.प.दत्तू शिंत्रे, धनंजय माळवदकर, श्याम मंचलकर, उमेश कपाटे, व्यंकटेश मिरजकर तर अधिक माहितीसाठी ह.भ.प राहुल महिंद्रकर गदग , ह.भ.प. चंद्रकांत वादोनी दावनगिरी, ह. भ. प. एकनाथ राशिनकर सवनूर, ह.भ.प. नागप्पा रंजनगी गुळेदगुडृ, ह.भ.प. महादेव सुलाखे हुबळी, ह.भ.प. आरंभ टिकारे राणेबेन्नूर यांच्याशी संपर्क करावा असे गुरुवर्य ह.भ.प. यशवंत बोधले महाराज यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
